नवभांडवली अर्थकेंद्रीत पाळतसमाजाची विचित्रचित्रे या कादंबरीतून प्रकटली आहेत. त्यामुळे ‘उद्या’च्या अंधारभयाचे हे वर्तमानकथन आहे
या कादंबरीत राज्यसंस्था, तंत्रज्ञान, बाजार, व्यापाराच्या मिलाफाने घडवलेल्या समाजवकाशाची चर्चा आहे. संगणकांच्या महाजाळातून प्रचंड ‘स्मरणसाठे’ साठवले जात आहेत. असंख्य ‘भक्तगट’ निर्माण झाले आहेत. ‘सरकार तुमच्या हगण्यामुतण्यावर लक्ष ठेवू शकते. केवायसी नावाचा उंट तुमच्या घरादारात, झोपण्याच्या खोलीत, संडासात, न्हाणीत घुसला आहे. या अदृश्य नियंत्रणाखालील मानवी समाजाचे चित्रण या कादंबरीत आहे.......